Pune Rain: "प्रामाणिकपणे टॅक्स भरूनही नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच," पहिल्याच पावसात पुणे तुंबले; धंगेकरांनी फटकारले

Ravindra Dhangekar: दरम्यान पावसामुळे दुर्दशा झालेल्या पुण्याच्या रस्त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत असून, पुणेकर याबाबत संताप व्यक्त करत आहेत.
Pune Rain 2024|Ravindra Dhangekar
Pune Rain 2024|Ravindra DhangekarEsakal

यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. लोकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या अक्षरश: रस्त्त्यावरील पाण्यात वाहू लागल्या.

ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला चांगलाच धुतला आहे.

Pune Rain 2024|Ravindra Dhangekar
Dr. Amol Kolhe : आगामी विधानसभा निवडणुकीत 'मविआ'ला 200 च्या वर जागा मिळणार; खासदार कोल्हेंना विश्वास

आमदार रवीद्र धंगेकर यांनी आपाल्या एक्स अकाउंटवर पावसामुळे पुण्यात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

यावेळी ते म्हणाले, "पाऊस झाला मोठा... नालेसफाई घोटाळा झाला खोटा... आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे. पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा... काळजी घ्या..."

Pune Rain 2024|Ravindra Dhangekar
Pune Rain : पुणेकरांना भर मुसळधार पाऊस, तुफानात सोडणाऱ्या प्रशासनाची 'सुट्टी' कधी?

शनिवारी पुण्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुण्यातील रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. सर्वसामान्यांसोबतच वाहनांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे.

दरम्यान पावसामुळे दुर्दशा झालेल्या पुण्याच्या रस्त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत असून, पुणेकर याबाबत संताप व्यक्त करत आहेत.

तथाकथित स्मार्ट सिटीच्या या अवस्थेला पुणे महानगरपालिका आणि पुणे मेट्रो जबाबदार आहेत. पावसाच्या अवघ्या एका तासात पुण्यातील रस्ते असेच तुडुंब भरले तर पावसाळ्यात काय होईल?? या पाण्यामुळे झालेल्या कार आणि 2 चाकी वाहनांची भरपाई कोण करणार?? तरीही आपण पुण्याला स्मार्ट सिटी म्हणावं का?? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com