
Pune News
sakal
पुणे : शहराच्या पश्चिम भागातील डोंगरउतारांवरून येणारे पाणी नाल्यांद्वारे नदीला मिळण्याच्या नैसर्गिक व्यवस्थेला फाटा देत महापालिकेकडून डोंगरउतारांजवळील, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) महामार्गालगतचे अनेक नाले वळविण्यासह बंद करून नाल्यांचा गळा घोटण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.