पुणे : उपनगरांत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाच्या जोरामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले..बाणेर बालेवाडी परिसरबाणेर-बालेवाडी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवरपाणी साचून वाहनांचा वेग मंदावलापॅनकार्ड क्लब रस्ता, दत्त मंदिर चौक अशा अनेकठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणीमिटकॉन चौक, साई चौक, एसकेपी कॅम्पसजवळचारस्ता परिसरात तळ्याचे स्वरूपदुपारच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थी,नागरिक त्रस्तरस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी अनेकांचा प्रयत्न.वारजे परिसरवारजे भागात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमयसेवा रस्ते आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीअनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहनेचालवणे कठीणपादचाऱ्यांनाही रस्त्यांवरून चालणे मुश्कील झाले आहे.संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यातअडचणी येत आहेत.धायरी परिसरनवले पूल सेवा रस्त्यावर पाणी वाहत असल्यानेवाहतुकीवर परिणामसिंहगड रस्त्यावरील लगडमळा, धायरी परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणीपावसाचे पाणी वडगाव पुलाखाली साचत असल्याने कोंडीधायरी फाटा उड्डाणपुलाजवळ अवजडवाहतुकीमुळे खड्डेसिंहगड रस्ता, धायरी भागात निचरा व्यवस्थेअभावी पाणीतुंबून वाहनचालक व पादचारी हैराण.औंध परिसरऔंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर रस्ता, सूस व महाळुंगे परिसरात सकाळपासूनच संततधार पावसामुळे अत्यावश्यक काम करणारे वगळता अनेकांनी घराबाहेर जाणे टाळलेकिरकोळ झाडपडीची घटनाऔंध, बाणेर फाटा, ब्रेमेन चौक येथे पाणी साचल्याने वाहनचालकांची कसरतऔंधमध्ये पाणी साचून वाहतूक मंदावल्याने कोंडीमहाळुंग्यातील शेडगे वस्तीजवळ आणि बोपोडीत हॅरीस पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक संथ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.