पुण्यात अवकाळी पावसाने रस्त्यावर साचलं पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; रस्ते जलमय

Pune Rain Traffic Jam : पुण्यात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वादळी वारे आणि गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे.
Sudden Rain in Pune Causes Waterlogging and Traffic Jam Across Several Areas

Sudden Rain in Pune Causes Waterlogging and Traffic Jam Across Several Areas

Esakal

Updated on

गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा कडाका वाढला असताना अचानक आज काही भागात गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. पुण्यात अवकाळी पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. १५ ते २० मिनिटाच्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com