

IMD Pune Weather Forecast Light Rain Expected Over Next Two Days with Cloudy Skies to Continue
sakal
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी रविवारी (ता. २६) सकाळी शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.