Pune : रेन हार्वेस्टिंगमुळे टँकरमुक्त सोसायटी होण्यास मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain harvesting

Pune : रेन हार्वेस्टिंगमुळे टँकरमुक्त सोसायटी होण्यास मदत

उंड्री : शिस्तबद्ध आणि नियोजनाला एकीचे बळ मिळाले आणि रेन हार्वेस्टिंग प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे पाण्यावर होणारा खर्च शून्य होऊन टँकरमुक्त सोसायटी होण्यास मदत झाली. मागिल आठवड्यापासून एकही पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागला नाही. दोन प्रकल्प पूर्ण झाले असून, आणखी तीन प्रकल्प नियोजित आहे, असे हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज सोसायटीचे चेअरमन योगेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

याप्रसंगी सचिव दिलावरभाई शेख, खजिनदार मधुकर जगताप, संचालक डॉ. अनिल पाटील, मोहन मोरे, विवेक मुळे. संजय पवार, श्रीकृष्ण ताजने, सुनील गव्हाले उपस्थित होते. गायकवाड म्हणाले की, सोसायटीने दोन पाण्याच्या टाक्या साठवणुकीसाठी उभारल्या आहेत. मागिल वर्षी रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आणि पहिल्याच वर्षी पावसाळ्यामध्ये सोसायटीने उभारलेली 20 हजार लिटर क्षमतेची टाकी फुल्ल भरली.

त्यामुळे सोसायटीला दररोज 10-12 पाण्याचे टँकरची गरज होती. मागिल आठवड्यापासून एकही टँकर घ्यावा लागला नाही, ही समाधानाची बाब आहे. रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यासाठी नितेश गद्रे, अंकुश जाधव, रतन कुंडू, गणेश वाडकर, वसीम फरास, मधुजी मेनन, रणपिसे मॅडम, संतोष करंजकर, गणेश पाटील, नाना सायकर यांच्यासह सोसायटीतील सर्व संचालकांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, रेन हार्वेस्टिंग प्रकल्पामध्ये टेरेसवरील पाणी जमा केले. ते पाणी सोसायटीच्या साठवणूक पाण्याच्या टाकीमध्ये जमा झाले. त्या पाण्यामुळे 762 सदनिकाधारकांना पाणी विहिरीमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी सहभाग घेतला. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते साठवून त्याचा वापर प्रत्येक सोसायटीने केला पाहिजे. पाण्यासाठी ओरड करण्याऐवजी त्यावर उपाय शोधणे ही काळाजी गरज आहे, असे मत डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले.