
Pune Rain
Sakal
पुणे : पावसाळ्यापूर्वी गटारांची व चेंबरची स्वच्छता केल्यानंतर ठेकेदारांनी पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने चेंबरच्या झाकणांवर कचरा अडकून पाणी तुंबत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहेच; पण ठेकेदारांचे व महापालिका प्रशासनाची बेपर्वाई समोर येत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत झालेली कामे केवळ ठेकेदारांची बिल काढण्यापुरतीच स्वच्छता केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.