
पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आयटी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी, अशी मागणी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’ या संघटनेने केली आहे. संघटनेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.