Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ९१ टक्क्यांवर; भाटघर, कळमोडी, नाझरे धरण शंभर टक्के भरले
Pune Rain Update : पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या खडकवासला धरणसाखळीमध्ये ९१.९७% पाणीसाठा झाला असून जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत.
पुणे : खडकवासला धरणसाखळीमध्ये पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणसाखळीमध्ये २६.८१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेला तो २६.५७ टीएमसी होता.