
पुणे : शहरातील नदीपात्रात मंगळवारी सायंकाळनंतर तब्बल ३५ हजार क्युसेक इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यापूर्वीच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांची सुरक्षितता, स्थलांतर, पाणी तुंबू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला. शहरातील ३१ ठिकाणी महापालिकेची पथके तैनात करण्यात आली.