Pune Rain News : पाणीच पाणी चोहीकडे...

पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील अण्णा भाऊ साठे वसाहतीत २० ते २५ घरांत ओढ्याचे पाणी.
Pune Rain News
Pune Rain Newssakal
  • गुरुजन सोसायटी, लालबहादूर शास्त्री कॉलनी, नव एकता कॉलनी, सुतारदरा, बावधनमधील विज्ञाननगर, एरंडवणामधील पूरग्रस्त वसाहत, गणेश नगर चाळ, नेहरू वसाहत अशा ठिकाणी पाणी साचले.

  • कर्वे पुतळा चौक, सारथी हॉटेललगतचा भाग, कर्वे रस्ता भागात वाहने बंद पडली.

  • कोथरूड कचरा डेपो परिसर, चांदणी चौक येथे सुमारे दोन फूट पाणी साचले.

  • सागर कॉलनी डीपी रस्त्यावर येथे महापालिकेने खोदकाम करण्यात आले होते, ते बुजविण्यात न आल्याने वाहतूक कोंडी.

  • कोथरूडमधील भाजप कार्यालयातही पाणी

सिंहगड रस्ता

१. पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील अण्णा भाऊ साठे वसाहतीत २० ते २५ घरांत ओढ्याचे पाणी.

२. पानमळा, हिंगणे, विठ्ठलवाडी, आनंदनगर, धायरीत पाणी साचले.

३. नादुरुस्त चेंबर, अतिक्रमण, ओढ्यातील कचरा, अर्धवट नालेसफाईमुळे पाणी साठण्याच्या घटना.

४. हिंगण्यात रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प, अग्निशमनने झाड हटविले.

कात्रज-कोंढवा परिसर

  • कात्रज-कोंढवा रस्ता, साईनगर, गोकूळनगर, सोमजी चौक भागात

  • मोठ्या प्रमाणात पाऊस.

  • रस्त्यावरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी पावसाळी लाईन नसल्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप.

  • पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित.

वडगाव शेरी, नगर रस्ता

  • नगर रस्ता परिसरातील विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगरमध्ये पूरस्थिती.

  • गंगापूरम, श्रीकृष्ण हॉटेल, पाचवा मैल आदी चौक, कल्याणीनगर येथील रामवाडी भुयारी मार्ग, हरी नगर, हरी नगरचा पूल, अर्नोल्ड शाळा येथील नाला अशा ठिकाणी नागरिकांची दैना.

औंध परिसर

१. औंधमधील सकाळनगर, सिंध सोसायटी, नॅशनल सोसायटीत पाणी तुंबले.

२. पाणी दरवर्षी तुंबत असले तरी सकाळनगर ते बाणेर फाटा येथे यंदा प्रमाण जास्त.

३. अभिमानश्री सोसायटी, एनसीएल येथील दक्षिण बाजूने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा.

घोरपडी परिसर

  • भीमनगर आणि बालाजीनगर येथे पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी.

  • घरांत जात पाणी जात असल्यामुळे नागरिकांनीच ड्रेनेजचे झाकण उघडले. अखेर पाण्याचा निचरा झाल्याने नागरिकांना दिलासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com