

41.1 mm rainfall in Pune in last 24 hours
esakal
Pune rainfall latest update: काल रात्री पासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर वेधशाळेत गेल्या 24 तासांत (सकाळी 8.30 पर्यंत) 41.1 मिमी पावसाची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यात 2019 नंतर 24 तासांत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. तसेच, 8 जुलै 2026 नंतर पुण्यातील 24 तासांतील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे.