Pune Rain : जुनी सांगवी परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune Rain : जुनी सांगवी परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

जुनी सांगवी : जुनी सांगवी,नवी सांगवी, दापोडी परिसरात विजांचा गडगडाटासह पावसाने नागरिक,भाजी विक्रेते, स्थानिक कार्यक्रम बाजारपेठा झोडपल्या. नवी सांगवी येथील कृष्णा चौकात सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांची घरी परतण्यासाठी त्रेधा उडाली. दिवाळी सणासाठी सध्या बाजारपेठेत गर्दी असल्याने नागरिकांना खरेदीऐवेजी पावसामुळे आहे त्याच ठिकाणी आडोसा घ्यावा लागला.काहींनी घर गाठणे पसंत केले.

साडे नऊ नंतर वादळी पावसाने तारांबळ उडाली.येथील साई चौक ते माहेश्वरी चौक रस्ता,चंद्रमणी नगर चौक रस्ता,मुळा नदी किनारा रस्ता सखल भागातील रस्त्यांवरून पाणी वहात होते.छोट्या गल्ल्यांमधील अनेक ठिकाणी चेंबर तुंबल्याने दापोडी भागात पडत्या पावसात नागरिकांना पाण्याचा निचरा करण्यासाठी वाट करून द्यावी लागली. रात्री नऊ वाजता रिमझिम पावसाने सुरू झालेल्या पावसाने साडेनऊ नंतर मेघगर्जनेसह जोरदार सुरूवात केली.

दापोडीत वादळी पावसाने दापोडी करांची दैना- वस्ती चाळीतील घरात पाणी-

सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सुरू झालेल्या मेघगर्जनेसह आलेल्या जोरदार पावसाने दापोडी येथील वस्ती चाळीत पाणी च पाणी झाल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. वादळी परतीच्या पावसाने लोकांच्या घरात पाणी घुसले.दापोडी त बऱ्याच चाळी त गल्लीत लोकांच्या घरात पाणी घुसल्याचे प्रकार घडले. चेंबर ओव्हरफ्लो,तुंबण्याच्या पृरकारामुळे परतीच्या पावसाचा वादळी तडाखा येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.