

Tree Collapse in Pune Claims Elderly Woman Life
Esakal
Pune Rain: पुण्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस पडत असून वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुल देशपांडे उद्यानाजवळ नवश्या मारूती परिसरात झाड एका टपरीवर पडून महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. पुण्यात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तर रस्त्यांवर साचलेलं पाणी वस्तीमध्ये शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. Woman Dies After Tree Falls During Pune Rain