Pune Rain : तोंडदेखल्या कामानेच पाण्याचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

शहरात बुधवारी झालेल्या पावसानंतर आंबिल ओढ्यालगतच्या दांडेकर पूल, सहकारनगर, अरण्येश्वर, शिवदर्शन भागातील लोकवस्त्यांची पाहणी करून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली.

पुणे - आंबिल ओढ्याची रुंदी २० मीटरवरून ७ मीटर झालीय. ओढ्यालगतच्या लोकांचा जीव वाचवायचा असेल, तर साडेपाच किलोमीटर लांबीच्या सीमाभिंती उभारायच्या आहेत. लोकवस्त्यांशेजारी २१ कर्ल्व्हट बांधायचे आहेत. राडारोडा उचलाचाय, ओढ्याभोवतीची झाडे तोडायची आहेत... हा ‘धडा’ गेल्या वर्षीच्या म्हणजे २५ सप्टेंबरच्या पावसाने महापालिकेला प्रत्यक्ष पाहणीतून दिला. त्यावर कार्यवाही करण्याऐवजी पाहणी, चर्चा, कार्यवाहीच्या घोषणा, निविदा, कामांचा तोंडदेखलेपणा केल्यानेच बुधवारी रात्री पुन्हा शेकडो घरांना पाण्याचा वेढा पडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीमाभिंती बांधल्याशिवाय आंबिल ओढल्यालगतच्या वस्त्या, सोसायट्यामंधील साडेतीन ते चार लाख लोक सुरक्षित होणार नाहीत, हे कळूनही महापालिकेने अद्याप भिंती उभारलेल्या नाहीत. पाण्याचा प्रवाह रोखणारी दोनशे झाडे तोडण्याचा प्रस्तावही पडूनच राहिला आहे. ‘सुशोभीकरणा’च्या नावाखाली नाल्यांवर बांधलेल्या उद्यानांतही सुधारणा    केल्या नसल्याने पश्‍चिम पुणे अजूनही आंबिल ओढ्यापासून ‘असुरक्षित’ असल्याचे पुन्हा ठळक झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात बुधवारी झालेल्या पावसानंतर आंबिल ओढ्यालगतच्या दांडेकर पूल, सहकारनगर, अरण्येश्वर, शिवदर्शन भागातील लोकवस्त्यांची पाहणी करून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली. तेव्हा रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या उपायांकडे ना पदाधिकारी, ना अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याचे दिसून आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धोक्‍याची घंटा
लोकवस्त्या आणि ओढ्यांत कमी उंचीची सीमाभिंत
ओढ्याभोवती सीमाभिंतीऐवजी मातीचा ढिगारा, तो कोसळण्याची भीती 
ओढ्यात कचरा,  राडारोडा
ओढ्याची रुंदी, खोली कमी झाल्याने शंभरहून अधिक वस्त्या, सोसायट्यांना पुराचा धोका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune rain Updaes heavy rain in pune ambil odha

Tags
टॉपिकस
Topic Tags: