Pune Rain News :आंबेगाव परिसरात गारपीट व पावसाने 500 हेक्टर क्षेत्रातील कांदा, बटाटा, वाटाणा पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतेत

आंबेगाव भागातील कुरवंडी, भावडी,थूगाव, कारेगाव या परिसरात रविवारी दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस
pune rain update crop damage in ambegaon 500 hectares weather marathi news
pune rain update crop damage in ambegaon 500 hectares weather marathi newsSakal

मंचर : सातगाव पठार (ता.आंबेगाव) भागातील कुरवंडी, भावडी,थूगाव, कारेगाव या परिसरात रविवारी (ता.२६) दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी लागवड केलेले ५०० हेक्टर क्षेत्रातील कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

“पावसाबरोबरच जोरदार गारा पडत होत्या, त्यामुळे पिकांची पाने गळून पडली आहेत. तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने पळवून नेल्यामुळे या भागातील ४०० हून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.” अशी माहिती भावडी गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक बाजारे व कुरवंडीचे रवींद्र तोत्रे यांनी दिली.

“पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासनाने वेळ न दवडता ताबडतोब पंचनामे करावेत.” अशी मागणी कारेगाव येथील शेतकरी राहुल सणस यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

मोठ्या आकाराच्या गारांचे थर शेतामध्ये पडले होते. काही जणांनी वाटाणा पिकाची तोडणी सुरू केली होती. जवळपास सर्वच पीक वाया गेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जाते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com