
मुसळधार पावसाने पुणे शहरात हाहाकार माजवला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर परिसरातील एकता नगर येथे ओढ्याचे बॅकवॉटर शिरल्याने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.