
कर्वेनगर : मागील दोन दिवसांपासून सरू असलेल्या संततधार पावसामुळे कर्वेनगर, वारजे, शिवणे, भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपनगरांमधील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर तळी साचली असून, पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनचालक, विद्यार्थी, गृहिणी, कामगार, तसेच व्यवसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे