Pune Rain : अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू

Pune Rain : अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू

अतिवृष्टीचा इशार लक्षात घेता पालिका प्रशासनातर्फे गुरुवारी आणि शुक्रवारी पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Published on

पुणे : पुणे आणि परिसरात हवामान खात्यातर्फे (Pune ) येत्या 48 तासात पावसाचा रेड अलर्ट (IMD Rain Alert) देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे पुणे जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Act 144 Imposed In Pune District )

Pune Rain : अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू
पुण्यात रेड अलर्ट! खाजगी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे आवाहन

येत्या 48 तासात पुणे आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला असून, अनेक पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गड आणि किल्ल्यांच्या ठिकाणी जात असतात. अनेकदा अपघात घडून एखाद्याचा नाहक बळी जण्याची दाट भीती असते. या सर्व शक्यता लक्षात घेऊन गड, किल्ले, धरणं तसेच पर्यटन क्षेत्रात प्रवेश बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 14 ते 17 जुलैदरम्यान, वरील सर्व ठिकाणी कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. (Pune Rain Update)

Pune Rain : अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू
धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले; सुर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, अतिवृष्टीचा इशार लक्षात घेता पालिका प्रशासनातर्फे गुरुवारी आणि शुक्रवारी पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधील 12 वी पर्यंतचे सर्व शाळा (School Collage) महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, पालिकेकडून खासगी कार्यालये आणि आयटी कंपन्यामधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) देण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या जमामबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे. (Pune School Closed Due to Heavy Rain)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com