esakal | धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले; सुर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Dhamni Dam

धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले; सुर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
महेंद्र पवार

कासा: पालघर (palghar) जिल्ह्यातील महत्त्वाचे मोठे धरण (Dhamni Dam) असणारे धामणी आज ता. 5 रोजी 99.06%भरले असून (water level) धरणाचे तीन दरवाजे 1,3, व 5 हे 11 सेंटीमीटर ने उघडले (Three Doors open) असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत (surya river) केला जात आहे. पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत असल्याने तसेच धामणी व कवडास या दोन्ही धरणांचे मिळून 4705 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत असल्याने प्रशासनातर्फे नदी किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा (villages on alert) इशारा दिला आहे. कोणीही नदी किनारी मासेमारी किंवा शेतकामाला जाऊ नये. धामणी धरणाची पाणी पातळी 118.60 मिटर असून 273.759 द. ल.घ. मी,पाणी साठा आहे.हे धरण 99.06%भरले आहे.यातून 1271क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

हेही वाचा: मुंबई काँग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा गौरव; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

तर कवडास धरण 65.50मिटर असून यात पाणी साठा 9.96द. ल.घ. मी.आहे.ते सुद्धा100%भरले आहे. धामणी पॉवरहाऊस साठी 649 क्युसेक पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यातील या दोन्ही धरणातून डहाणू,विक्रमगड, पालघर तालुक्यातील शेकडो गावांना सिंचना साठी पाणी सोडले जाते,उजवा कालवा व डावा कालव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो त्यातून 14.600 हेक्टर शेती सिंचना खाली येते.

यामुळे येथील शेतकरी उन्हाळी हंगामाचे मोठया प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात.त्याच प्रकारे वसई,विरारमहानगरपालिका ,बोईसर ,तारापूर औधोगिक वसाहत, डहाणू अदानी प्रकल्प येथे पिण्याचे पाणी पुरविले जाते,सद्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाणी साठ्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे.धामणी धरण भरल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

"धामणी धरण 27जुलै ला पूर्ण भरले होते. तेव्हा तीन दरवाजे उघडले होते. सद्या,धरण क्षेत्रात मोठा पाऊस होत असल्याने आज धामणीचे तीन दरवाजे उघडले आहेत.सूर्या नदी किनाऱ्यावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे."

युवराज पाडेकर - शाखा अभियंता -धामणी धरण.

loading image
go to top