Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Khadakwasla Dam Reaches Full Capacity as Red Alert Issued for Pune Ghat Areas : पुण्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे, तर चारही धरणांमध्ये ७८.४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
pune rain update

pune rain update

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, हवामान विभागाने पुणे शहराच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com