pune पाणी ओसरले, तरी दुर्गंधी हटेना, त्यातच पुन्हा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune: पाणी ओसरले, तरी दुर्गंधी हटेना, त्यातच पुन्हा पाऊस

उंड्री: घरांमधील पाणी ओसरले, तरी दुर्गंधी काही पाठ सोडत नाही. गुरुवारी (दि. १५ सप्टेंबर २०२२) भल्या पहाटेपासून पाऊस सुरू झाल्याने पुन्हा घरामध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांना जागून काढावी लागली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले, अशी व्यथा सय्यदनगर रेल्वे गेट ते हांडेवाडी रस्ता आणि महंमदवाडी रस्ता येथील नागरिकांनी मांडली.

सय्यदनगरमधील अनेक घरामध्ये दरवर्षी पाऊस झाला की, पाणी शिरते. त्यामुळे फर्निचर, अन्नधान्याचे नुकसान होते, कपडे ओल्या कपड्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतो. घरात पाणी... दारात पाणी... अशी अवस्था असल्याने घराबाहेर पडता येत नाही, रात्र जागून काढावी लागले, लहान लेकरांना कॉटवर, दिवाणवर बसवून ठेवायचे, अशी अवस्था आमची होते. मुख्य रस्त्याची उंची वाढली, घरे रस्त्याच्या उंचीपेक्षा खाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी येथील नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे. पालिका प्रशासनाने मुख्य रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकावी, तसेच मलवाहिनी मोठी टाकून येथील नागरिकांची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी गणेश राऊत, समीर वाडकर, किरण लाडके, नरेश भंडारी, मुस्ताफा शेख, सुहेल अन्सारी, अमीन शेख, वासिम शेख यांनी नागरिकांच्या वतीने केली.

परतीच्या पावसाने रविवारी आणि मंगळवारी जोरदार हजेरी लावली, त्यामुळे सय्यदनगरमधील रस्तेजलमय झाले, मलवाहिनीतील पाणी घरांमध्ये शिरले, पावसाने उघडीप दिल्यानंतर पाणी ओसरले मात्र दुर्गंधी हटत नसल्याने अनारोग्य पसरण्याची भीती वाटत आहे.

-मुजूप शेख, अल्लाबक्ष शेख, सय्यदनगर

पावसाळी वाहिनी नाही, घरे खाली आणि मुख्य रस्त्याची उंची वाढली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मलवाहिनीची झाकणे नागरिकांकडून उघडली जातात. मात्र, पावसाच्या पाण्याबरोबर ड्रेनेजमधील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. पाणी ओसरल्यानंतरही घरामध्ये दुर्गंधीचा त्रास होत आहे.

- समीर वाडकर, कल्पतरू सोसायटी-१, २ सय्यदनगर

दोन दिवस धोधो पाऊस कोसळल्यानंतर सय्यदनगर रेल्वे गेटजवळ पाण्याचे तळे साचले होते. त्यावेळी पावसाळी वाहिनी कुठे टाकली आहे. घरात-दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.

-बशीरभाई तांबोळी, सय्यदनगर

दरम्यान, महापालिकेचे शाखा अभियंता गणेश पूरम म्हणाले की, रविवारी जोरदार पावसामुळे पाणी कोठे साचले त्याची पाहणी झाली असून, त्यानुसार पुढील वर्षी बजेट उपलब्ध झाल्यानंतर पावसाळी वाहिनी टाकण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Pune Rain Update Now Undri Citizens Of Syed Nagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..