
गेल्या सात ते आठ दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस कोसळत आहे. आज सकाळी देखील रिमझिम पावसाने शहराला झोडपले. या पावसाचा सर्वाधिक फटका स्वारगेट बस स्थानक परिसराला बसला आहे. येथे साचलेल्या पाण्यामुळे स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुणेकरांसाठी स्वारगेट बस स्थानकातून प्रवास करणे आता आव्हानात्मक बनले आहे.