
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनने हजेरी लावल्याने दमदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. मागील काही तासांपासून पुण्यात पावसाचा जोर कमी झाला असून पुढील २४मतासांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.