
पुणे: दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आज दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाला रात्री ९ वाजता अचानक सुरूवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान शहरातील सिंहगड रस्ता परिसरात अति मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील २ ते ३ तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फुरसुंगी, उरुळी देवाची आणि परिसराला वाऱ्यासह विजेच्या कडकडाट आणि जोरदार पावसाने झोडपले. दिडतास जोरदार पाऊस चालू असून वाऱ्याचा जोर एवढा जास्त आहे की पार्क इंफिनिया सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील प्लॅट मध्ये पाणी वाऱ्याने आतमध्ये आल्याचा प्रकार घडला.
तसेच नगर रस्ता परिसरात आता पावसाचा जोर वाढला आहे. पावणेदहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. स्वारगेट, महर्षी नगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी परिसरात मुसळधार पाऊस गेल्या एक तासापासून सुरू आहे. यासोबतच बाणेर-बालेवाडी भागातही जोरदार पाऊस आहे.
धनकवडी, बिबवेवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून स्वामी विवेकानंद मार्गाला नदीचे स्वरुप आले आहे, भारत ज्योती ते अप्पर कमानी पर्यंत रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे, बिबवेवाडी कडून अप्पर कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे. इंदिरा नगर, महेश सोसायटी चौकात मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे.
तर बिबवेवाडी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून गावठाण सह परिसरातील लाइट गेल्या पंधरा मिनिटापासून बंद पडला आहे.
सोमवार पेठ भागात मीटर बॉक्स शॉर्टसर्किट झाल्याचा प्रकार समोर आळा आहे. तर येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड परिसरात असणाऱ्या अनेक घरात पाणी शिरले असून हडपसर, आकाशवाणी जवळ झाड पडीच्या घटना घडल्याची 10.40 पर्यंत अग्निशमन दलाकडे नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.