Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Pune Rain Update:
Pune Rain Update: esakal

Pune News : पुणे शहरासह परिसरात शनिवारी सायंकळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर शनिवारीही जोरदार अवकाळी पाऊस बरसला.

पुण्यातील धानोरी, मुंढवा केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला सुरुवात झाली असून घोरपडीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. तसेच लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

Pune Rain Update:
Wedding Invitation : नातेवाईकांच्या घरी जाऊन पत्रिका देण्याचे संपले दिवस, विवाहाचे निमंत्रण आता सोशल मीडियावरून.!

पुणे शहरातील मुख्य भाग असलेला शिवाजी नगरमध्येही जोरदार पाऊस सुरु झाला आहे. तसेच बाणेर, सांगवी आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने हजेरी लावली.

पावसासह मोठ्या प्रमाणावर वादळी वारे दाखल झाल्याने काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. कामावरुन घराकडे निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे बघायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com