Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ, सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक ठप्प; पुढील दोन-तीन दिवस जोर कायम राहण्याचा अंदाज
The India Meteorological Department has issued a Red Alert for Pune's ghat areas, warning of extremely heavy rainfall over the next two days.

The India Meteorological Department has issued a Red Alert for Pune's ghat areas, warning of extremely heavy rainfall over the next two days.

Sakal
Updated on

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने पुन्हा जोर धरला असून, गुरुवारी (ता. २३) सायंकाळी झालेल्या मुसळधार सरींमुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि शहरातील विविध भागांत वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात काही ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने या परिसरात ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com