पुणेकरांनो घरीच रहा! महापौरांनी दिला सतर्कतेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांनो घरीच रहा! महापौरांनी दिला सतर्कतेचा इशारा

पुणेकरांनो घरीच रहा! महापौरांनी दिला सतर्कतेचा इशारा

पुणे : पुण्यात सध्या जोरदार पाऊस पडतोय. याबाबत आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यांनी म्हटलंय की, पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा. पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा !

पुढे त्यांनी मदतीसाठी हेल्पलाईन जाहिर केली आहे.

पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष !

मदतीसाठी संपर्क साधा

आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र

०२०-२५५०६८००/१/२/३/४

०२०-२५५०१२६९

Web Title: Pune Raining The Pune Mayor Murlidhar Mohol Issued A Warning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsMurlidhar Mohol
go to top