Pune Rains : नुकसान झाले असल्यास पंचनामे करा; जितेंद्र डुडी यांचे तहसीलदारांना आदेश
Crop Damage : पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेती व फळबागांचे नुकसान झाल्याची शक्यता असून, जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे का, यांची तपासणी करावी. झाले असल्यास तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.