
खडकवासला : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण साखळीतून विसर्ग वाढविला असून या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने सज्जता अधिक वाढवत, संपूर्ण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. धरणांवरील कार्यवाही सुरक्षित राहावी, यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.