
पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन दिवस शहरासह घाटविभागात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तसेच, कमाल व किमान तापमानातही नेहमीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घट झाली आहे.