
पुणे जिल्ह्यातील साखर(ता.राजगड) येथील एका समाज कंटकाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ मोबाईल स्टेटस ठेवल्याने प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या परिसरातील संतप्त जमावाने प्रार्थना स्थळाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची पाहणी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.