

Major Pipeline Burst Disrupts Water Supply in Pune
sakal
पुणे : लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे हडपसर व परिसरातील गावे, वाड्या- वस्त्यांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शनिवारी (ता. २७ ) संबंधित परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे.