
Ranjangaon Murder Case: शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती या गावाजवळ पंधरादिवसांपूर्वी एक महिला आणि तिच्या १ वर्षे आणि २ वर्षे वयाच्या दोन चिमुकल्यांना जाळून मारल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. या हत्याकांडांचा छडा लावणं हे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.
यामध्ये संबंधित मृत महिलेच्या हातावर गोंदलेल्या काही अक्षरांच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली त्यानंतर आरोपीचा शोध घेतला. यामध्ये धक्कादायक खुलासा झाला तो म्हणजे आरोपी हा संबंधित महिलेचा जवळचा नातेवाईकच निघाला. पण त्यानं ज्या पद्धतीनं महिला आणि तिच्या लहान मुलांचा जीव घेतला त्यावरुन अतिशय थंड डोक्यानं त्यानं हे हत्याकांड घडवून आणल्याचा समोर आलं आहे.