पुणे - महाराष्ट्र सरकारच्या 'मिशन १००' दिवसांच्या कार्यक्रमात पुणे महापालिकेला चमकदार कामगिरी दाखविता आलेली नव्हती. पण आता १५० दिवसांच्या मिशनमध्ये मात्र ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात सर्वोकृष्ट कामगिरी केली आहे. राज्यात पहिला क्रमांक आल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान करण्यात आला.