
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट आता समोर आली आहे. खराडी परिसरात एका लॉजमधील फ्लॅटवर शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यात २ महिलांसह ५ पुरुषांता ताब्यात घेण्यात आलंय. यात एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याच्या पतीलासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं आहे.