

पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावरील तुळापूर येथील एका रिसॉर्टमध्ये विनापरवाना आयोजित करण्यात आलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे धडक कारवाई करत मोठा छापा टाकला. 'प्रोजेक्ट एक्स' या नावाने आयोजित केलेल्या या पार्टीत अमली पदार्थांचा वापर आणि अवैध दारू विक्री होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.