RC Book Smart Card : वाहन परवाना, ‘आरसी’साठीची प्रतीक्षा संपली; १ जुलैपासून नवे स्मार्ट कार्ड उपलब्ध

स्मार्ट कार्ड उपलब्ध नसल्याने राज्यातील हजारो वाहनधारकांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे.
rc book
rc booksakal
Updated on

- प्रसाद कानडे

पुणे - स्मार्ट कार्ड उपलब्ध नसल्याने राज्यातील हजारो वाहनधारकांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, परिवहन विभाग आता आधुनिक मशिनचा वापर करून स्मार्ट कार्ड प्रिंटिंगचा वेग वाढविणार आहे. त्यामुळे दिवसाला ४५ हजार स्मार्ट कार्डच्या मदतीने वाहन परवाना व आरसी (वाहन नोंदणी प्रमाणपत्र) तयार केले जाणार आहे. तसेच नव्या स्मार्ट कार्ड रूपदेखील बदलणार आहे. पूर्वीच्या तुलनेने अधिक चांगल्या दर्जाचे व कमी किमतीचे हे स्मार्ट कार्ड उपलब्ध होईल. १ जुलैपासून नवे स्मार्ट कार्ड वाहनधारकांना उपलब्ध होणार आहे.

स्मार्ट कार्डच्या पुरवठ्याबाबत हैदराबाद येथील रोझमार्टा या कंपनीशी राज्याच्या परिवहन विभागाचा असलेला करार संपुष्टात आला आहे. आता कर्नाटक येथील मणिपाल टेक्नॉलॉजी कंपनीला स्मार्ट कार्डचे कंत्राट देण्यात आले आहे.

त्यानुसार रोज किमान ४५ हजार स्मार्ट कार्ड परिवहन विभागाला मिळतील. तसेच यंदा पहिल्यांदाच परिवहन विभागाने स्मार्ट कार्डवर वाहनधारकांचे नाव, पत्ता प्रिंट करण्याचे अधिकार स्थानिक आरटीओ कार्यालयांकडून काढून घेतले आहेत. आता हे अधिकार राज्यातील केवळ तीनच आरटीओ कार्यालयाला असतील. यात पुणे, मुंबई व नागपूर यांचा समावेश असेल.

rc book
Pune Crime : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या सहा बुकींना अटक

नव्या स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये

  • पहिल्यांदाच लेझर इंग्रिव्हिंग तंत्राचा वापर

  • वाहनधारकाचे नाव, फोटो चांगल्या दर्जाचे छापले जाणार

  • नाव व फोटो अस्पष्ट होणार नाहीत

  • स्मार्ट कार्डमध्ये चिपचा वापर नसेल

  • पॉलिकार्बोरेडरच्या वापरामुळे कार्ड टिकाऊ

  • कार्डवर उष्णतेचा परिणाम होणार नाही

सद्यस्थितीतील दर

  • वाहन परवाना काढण्यासाठी - ९४ रुपये

  • आरसी काढण्यासाठी - ५६ रुपये

नवे कार्ड आल्यावर दर

  • वाहन परवाना काढण्यासाठी - ६४ रुपये

  • आरसी काढण्यासाठी- ६४ रुपये

rc book
Property Tax : अद्यापही पुणे महापालिकेतील दीड लाख नागरिक मिळकतकर बिलाच्या प्रतिक्षेत

नव्या स्मार्टकार्डच्या दरानुसार

  • वाहन परवाना काढताना ३० रुपयांची बचत

  • आरसी काढताना ८ रुपयांची बचत

दृष्टिक्षेपात

  • पुणे, मुंबई, नागपूर आरटीओत स्मार्ट कार्ड प्रिंट

  • तीन आरटीओ मिळून तीन प्रिंट मशिन

  • प्रतिदिन ४५ हजार स्मार्ट कार्ड प्रिंट

  • राज्यात वर्षाला ८० लाख स्मार्ट कार्ड प्रिंट

वाहनधारकांना आता स्मार्ट कार्ड नव्या रूपात मिळेल. यात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात व चांगल्या दर्जाचे कार्ड उपलब्ध होतील. त्यामुळे वाहनधारकांना कार्डची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com