

LLP Funds Used for Illegal Land Sale and Plotting
Sakal
पुणे : जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात धनंजय कृष्णा वाडकर आणि त्याच्या जावयाच्या घराची नुकतीच झडती घेण्यात आली. या कारवाईत गुन्ह्याशी संबंधित डिजिटल व कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत. लॅव्हिश लक्झरी एलएलपीच्या निधीतून खरेदी केलेल्या मुळशी तालुक्यातील कासार साई येथील सुमारे १६ एकर जमिनीची परस्पर संमतीशिवाय प्लॉटिंग करून विक्री करत तब्बल ५७ कोटी १४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एलएलपीचा भागीदार धनंजय कृष्णा वाडकर (वय ५८, रा. कात्रज, पुणे) व अन्य आरोपींवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.