Pune Monsoon: पावसाचा ११९ वर्षांचा विक्रम, पुणे शहरात जुलैमध्ये ५२६ मिलिमीटर पावसाची नोंद

Pune Records Highest July Rainfall in 119 Years: पुण्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पुणे पाऊस, जुलै विक्रम, 119 वर्षांचा रेकॉर्ड या चर्चेला उधाण आले आहे.
Pune Monsoon

Pune Monsoon

esakal

Updated on

पुणे: यंदाच्या पावसाळ्यात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची भीती हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली होती. मात्र, निसर्गाने हे सर्व अंदाज फोल ठरवत पुणे शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टी केली आहे. पुणे शहरामध्ये जुलै महिन्यात ५२३ मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून, यामुळे १९०७ मधील सर्वाधिक पावसाचा ११९ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक विक्रम मोडीत निघाला आहे. जूनमधील पावसाची मोठी तूट भरून काढत जुलै महिन्याने पुण्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com