pune cold
sakal
पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात थंडीची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आणखी दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात आणखी किमान दोन दिवस तरी गोठविणारा गारठा जाणवणार आहे. तर पुण्यात ८.४ अंश सेल्सिअस अशा यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी झाली.