Pune Cafe Flying Gypsy Attack Case
esakal
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात शनिवारी पहाटे एका तरुणावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली होती. ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेबाहेर पडत असताना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप याला एका टोळक्याने अडवलं होतं. त्यानंतर झालेल्या वादातून त्याच्यावर शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी आता डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, रील क्रिएटर माधवी कुंभारसह सात जणांना अटक केली आहे.