
पुणे : नगररोड क्षेत्रीय कार्यालय कडून
रामवाडी : केंद्रशासन अधिसूचने नुसार सिंगल वापर प्लॅस्टिकचे उत्पादन, साठवणूक, आयात, वितरण, वापर किंवा विक्री करण्यास 1जुलै 2022 पासुन बंदी घालण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या
नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय दिनांक 06/07/2022 रोजी सहा.आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुकुंद घम तसेच आरोग्य निरीक्षक संदेश रोडे आणि समीर खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिक बाबत कारवाई व जनजागृती करण्यात आली.
जुना मुंढवा रोड साईनाथनगर वडगावशेरी येथे दोघांवर कारवाई करण्यात आली.प्रत्येकी 25000 रुपये दंडप्रमाणे एकूण 50,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. कारवाई अंतर्गत अंदाजे 300 ते 350 किग्रॅ प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
सदर कारवाई मोकादम. श्री.विशाल साबळे, अविनाश मोरे,व आरोग्य कोठी कर्मचारी शयोगेश शेलार, विनोद निकाळजे, निलेश बनसोडे.यशवंत लोंढे, वडगावशेरी गावठाण आरोग्य कोठी वरील सेवक उपस्थित होते.
एकूण केस - 02
दंड - 50,000 रुपये
Web Title: Pune Regional Office Plastic Action Against
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..