
Maharashtra government neglects research scholars
esakal
पुणे : जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणारे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या योजनांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, सोमवारी संशोधक विद्यार्थ्यांनी ‘आक्रोश मोर्चा’ काढला. गेल्या तीन वर्षांपासून बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (फेलोशिप) वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.