DJ Sound System Issue : सणांच्या काळात डीजे, डॉल्बीला चाप लावा; पुणेकरांचे पोलिस आयुक्तांना साकडे

आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा आला ऐरणीवर.
Dj Sound System

Dj Sound System

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणांच्या काळात, तसेच शहरातील पब, हॉटेल्स आणि बारमधून रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी बोट क्लब आणि कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांच्या प्रतिनिधींनी नुकतीच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी ध्वनिप्रदूषणाचे नियम काटेकोरपणे राबविण्याबाबतच्या स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com