Pune : उत्पादनांची कार्यक्षमता वाढविणारे रेसोनेटिंग माइंडझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune news

Pune : उत्पादनांची कार्यक्षमता वाढविणारे रेसोनेटिंग माइंडझ

पुणे : उद्योग क्षेत्राला लागणारे मशिन बनविणारे व ते वापरणारे अनेक व्यवसाय राज्यात आहेत. त्यासाठी मोठी गुंतवणूकदेखील केली जाते. त्यामुळे त्या युनिटमधून आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळावे, अशी व्यावसायिकांची अपेक्षा असते. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी येऊन किंवा ती यंत्रणा चालविणारे मनुष्यबळ योग्य नसेल तर उत्पादनावर परिणाम होतो.

उत्पादनावर परिणाम करणारे किंवा चांगले उत्पादन वाढविणाऱ्या बाबी नेमक्या कोणत्या हे शोधून काढणे मुश्कील काम असते. तसेच युनिक किंवा फॅक्टरीमध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात का, याचीदेखील भविष्यवाणी करणे सोपे नसते. उत्पादक कंपन्यांची हीच अडचणी रेसोनेटिंग माइंडझ (Resonatingmindz)ने अद्ययावत तंत्रज्ञान वापरून दूर केली.

फॅक्टरी डिजिटायझेशन आणि इंडस्ट्री ४.० वर आधारित असलेले हे स्टार्टअप उत्पादनाचा रिअर टाइम डेटा घेऊन उत्पादनातील अकार्यक्षमता दाखवून देते. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनातील दोष समजून घेत ते दूर करण्यास आणि उत्पादन वाढविण्यास मदत होते.

पीएलएम डोमेनमध्ये १९ हून वर्षांचा अनुभव असलेले अविनाश माने-रहिमतपूरकर आणि वेब आणि एंटरप्राइझ ॲप्लिकेशन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन लर्निंग, एआय आणि एंटरप्राइझ मोबिलिटी या क्षेत्रातील तज्ज्ञ हर्ष चौहान यांनी या स्टार्टअपची नोव्हेंबर २०१९ साली बालेवाडीत स्थापना केली आहे. अविनाश हे अभियंता असून, त्यांनी एम.टेक केले आहे.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये

- उत्पादन वाढविण्यास मदत करते

- मशिनमधील संभाव्य दोषांची पूर्वकल्पना मिळते

- फॅक्टरीमधील उत्पादनाचा रिअल टाइम डेटा मिळतो

- उत्पादनाच्या कोणत्या टप्प्यात दोष आहे हे समजते

- ऊर्जेचा किती व कुठे वापर झाला हे कळते

- निकामी होण्याआधी समजतात दोष

स्टार्टअपने तयार केलेले यंत्र उत्पादन करणाऱ्या मशिनचा डेटा वापरून त्याच्यातील दोष आधीच ओळखते. त्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया ठप्प होण्याआधीच मशिनची देखभाल करता येते. मोटार, पंप अशी उपकरणे खराब होणार असतील तर त्याची पूर्वकल्पना कंट्रोल रूम देते. उत्पादनासाठी कोणत्या मशिनने किती गॅस, पाणी, वीज वापरली याची तंतोतंत माहिती मिळते. त्यामुळे दोष असलेले यंत्र समजण्यास मदत होते. तर एखाद्या अंतिम उत्पादनात काही दिवसांनी दोष निर्माण झाला, तर तो उत्पादनाच्या कोणत्या टप्प्यावर झाला हे शोधून काढणारे मशिनदेखील स्टार्टअपने विकसित केले आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून १० अभियंत्यांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

बाजारात सर्व्हे केल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, आपल्याकडील उद्योग व्यवसायिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे आम्ही फॅक्टरीच्या डिजिटायझेशनला सुरुवात केली. कोणताही व्यावसायिक मोठी गुंतवणूक करतो तेव्हा त्याला जास्त व चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असते.

- अविनाश माने-रहिमतपूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख अभियंता, रेसोनेटिंग माइंडझ

Web Title: Pune Resonating Mindz That Enhances Product Performance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..