Pune News: पुण्यात बांधकामांना वेळेची मर्यादा; सकाळी सात ते रात्री नऊदरम्यानच कामास परवानगी, पुणे महापालिकेकडून आदेश!

Pune civic body guidelines for building work timing: पुण्यात बांधकामांच्या वेळेवर निर्बंध; सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंतच कामास परवानगी
PMC Issues Order Limiting Construction Work Timings in Pune

PMC Issues Order Limiting Construction Work Timings in Pune

sakal

Updated on

पुणे: विविध कारणांमुळे शहरात निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम ‘सकाळ’ने वृत्तमालिकेद्वारे पुढे आणले. त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने प्रदूषणास हातभार लावणाऱ्या बांधकाम क्षेत्राला प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी जरब बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने बांधकामाच्या वेळेवर निर्बंध आणले आहेत. त्याबाबतचे आदेश महापालिकेने बुधवारी दिले. त्यानुसार, आता शहरातील सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com