

पुणे, ता. २० : हवेली आणि खेड प्रांताधिकारी कार्यालयातील वाढत्या एजंटगिरीची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. खासगी व्यक्तींमार्फत होणारे गैरव्यवहार आणि वसुली खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जमिनींचे वाद, निकाल आणि फायलींच्या देवाणघेवाणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयांत अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी खासगी माणसे सक्रिय असल्याच्या तक्रारी मंत्र्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. गौणखनिज वाहतुकीवर कारवाईच्या नावाखाली होणारा थेट हस्तक्षेप आणि पक्षकारांकडून केली जाणारी वसुली यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या तक्रारींबाबत लवकरच शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे.
‘चौकशी करून कारवाई करणार’ :
‘‘हवेली आणि खेड प्रांताधिकाऱ्यांचे काही खासगी एजंट सुनावण्या व कामांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या प्रकाराची मी स्वतः माहिती घेत असून, सर्वसामान्यांची पिळवणूक अजिबात सहन केली जाणार नाही. सविस्तर चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’’ असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.