Pune : नोबेल विजेते शास्रज्ञ देणार पुणे विद्यापीठाला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिचर्ड जे. रॉबर्ट्स

Pune : नोबेल विजेते शास्रज्ञ देणार पुणे विद्यापीठाला भेट

पुणे : नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळावारी (ता.२) दोन दिवसीय भेटीसाठी येत आहे. भारत दौऱ्यारोबरच आपल्या संशोधनाचा प्रवास आणि त्याचे विविध पैलू सर रॉबट्स या भेटीत उलगडणार आहेत.

मंगळवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनीटांनी विद्यापीठातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस) येथे ‘नोबेल पारितोषिकाचा मार्ग’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कुंभार यांनी दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचीही ते भेट घेणार आहेत.

त्यांच्या याच भेटी दरम्यान ते सिरम इन्स्टिट्युट, पर्सिस्टंट अशा विविध औद्योगिक संस्थाना भेटी देणार आहेत. तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र येथील संशोधकांना ते माार्गदर्शन करतील. मॉडर्न व फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. सर रॉबर्ट्स हे १९९३ सालातील वैद्यकशास्रातील नोबेल पारितोषिक विजेते आहेत. सेंद्रिय रसायनशाास्त्रज्ञ म्हणून संशोधन कार्य केल्यानंतर त्यांनी आपल्या संशोधनाची दिशा जीवशास्त्रीय संशोधन कार्यासाठी समर्पीत केली. कदाचित हाच त्यांचा प्रवास सार्थ ठरला आणि त्यांची संशोधनाची वाटचाल ही वेगळ्या उंचीवर पोहोचली.

व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण ः

सर रॉबर्ट्स यांच्या व्याख्यानाचे प्रसारण विद्यापीठाच्या https://webcast.unipune.ac.in या संकेतस्थळावर मंगळवारी सकाळी ११.४५ ते दुपारी १.२५ या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येईल. या व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी घ्यावा असे आवाहन रसायनशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.