पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार...

5 वर्षांनंतर पुण्यात रिक्षांचे भाडे महागणार
Auto Rikshaw
Auto RikshawTeam eSakal

पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठ नोव्हेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 20 रुपये तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये भाडेदर असणार आहे.

खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाड पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीच्या हद्दीत लागू होणार आहे. यापूर्वी पहिल्या दीड किलोमीटरसाठी 18 रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 12.19 रुपये दर होता.

Auto Rikshaw
पुणे : बाजारपेठेचे सीमोल्लंघन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात या रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेंटीमीटर आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी तीन रुपये शुल्क लागू राहील, अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

या रिक्षांनाच भाडेदरवाढ लागू राहणार

ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलिब्रेशन) येत्या आठ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात येत आहे. या मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करुन घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडेदरवाढ लागू होईल. मुदत समाप्तीनंतर किमान सात दिवस आणि कमाल ४० दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन केले जाईल. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यासाठी इच्छुक रिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी पाच रुपये आकारण्यात येतील. जे किमान पाचशे रुपये आणि कमाल दोन हजार रुपये या मर्यादेत राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com